20+ Gavlani Lyrics – मराठी गवळणी लीरिक्स

SHARE THIS POST

Gavlani is known as Bhajan of Lord Krishna written in the Marathi Language, most of them were sung and published in the 19th century by Sumeet Music in Audio Casset form.

मराठी गवळणी श्री कृष्ण भक्त खास करून स्त्री वर्गा मध्ये खूप प्रचलित होती, १९९० च्या काळात आजही तीच आवड मराठी स्त्रियांमध्ये बघयला मिळते परंतु आम्ही लहान होतो तेव्हा सुमित कासेट्स मध्ये रोज संध्याकाळी ह्या गवळणी ऐकत होतो।

असो, आज आपण मराठी गवळणी च्या आठवणी जपणार आहोत आणि सर्व गवळणी चे लीरिक्स खाली देणार आहोत। ज्याना कोणाला नवीन गवळण माहीत असेल किंवा एखादी चुकून लिहायची राहली असेल प्लीज कमेंट मध्ये सांगा.

Top 20 Gavlani Songs with Lyrics

श्री कृष्ण मराठी गवळण लिस्ट: List of Gavalani

  1. धरीला पंढरीचा चोर
  2. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे
  3. वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
  4. कान्हा ग बाई हळूच मरतो खडा
  5. रूतला पाई काटा
  6. सख्यानो चला
  7. राधे चल माझ्या गावाला जाऊ
  8. दही दूध खाऊनी
  9. नको रे वाजऊ बासरी
  10. माझा माठ फोडीला
  11. गोपी गलबला झाला
  12. बाई माझ्या दुधात नाही पानी
  13. छुम छन न न न न
  14. पाण्या निघाली गवळण
  15. लहान लहान मुले
  16. आला बघा मुरली वाला
  17. आज बाळ कृष्ण जन्मला
  18. ऐक ऐक सखे बाई
  19. धाकामधला माझा मोहन माझा
  20. यशोदा तुझ्या कृष्णाने
  21. मुरलीवाला मुरलीवाला
  22. नको वाजवू श्रीहरी मुरली
1. धरीला पंढरीचा चोर Lyrics

धरीला पंढरीचा चोर गवळण लीरिक्स

धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 
गळा बांधुनिया दोर गळा बांधुनिया दोर 

धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर
धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर

धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 

ह्रदय बंदी खाना केला ह्रदय बंदी खाना केला 
ह्रदय बंदी खाना केला ह्रदय बंदी खाना केला 

ह्रदय बंदी खाना केला आत विट्ठल कोंडिला 
ह्रदय बंदी खाना केला आत विट्ठल कोंडिला 

धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 

शब्दी केलि जाड़ा जोड़ी शब्दी केलि जाड़ा जोड़ी 

शब्दी केलि जाड़ा जोड़ी विट्ठल पायी घातली वेडी 
शब्दी केलि जाड़ा जोड़ी विट्ठल पायी घातली वेडी 

धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 

सोहम शब्दांचा मारा केला सोहम शब्दांचा मारा केला 

सोहम शब्दांचा मारा केला विट्ठल काकुळतीला आला 
सोहम शब्दांचा मारा केला विट्ठल काकुळतीला आला 

धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 

जनि मने का विट्ठला जनि मने का विट्ठला 

जनि मने का विट्ठला जिवे न सोडी मी रे तूला 
जनि मने का विट्ठला जिवे न सोडी मी रे तूला 

धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 

धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 
गळा बांधुनिया दोर गळा बांधुनिया दोर 

धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर
धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर

धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 

2. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे Lyrics

देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे

देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे
मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे

मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे

कपाळी काजळ डोळ्यांमध्ये कुंकू
कपाळी काजळ डोळ्यांमध्ये कुंकू

हळदी ने मळवट भरिले हळदी ने मळवट भरिले

मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे

नाकामद्धे बुगडी डोईवर लुगडी
नाकामद्धे बुगडी डोईवर लुगडी

दंडात पैजन भरिले दंडात पैजन भरिले

मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे

गाईची वासरे म्हशीला सोडली
म्हशीची वासरे गाईला सोडली

बैलाची धार कशी काढू रे बैलाची धार कशी काढू रे

मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे

एका जणार्धणी पूर्ण कृपेने
एका जणार्धणी पूर्ण कृपेने

हरी चरणी चित्त वाहिले हरी चरणाशी चित्त वाहिले

मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे

देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे
मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे

मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे

3. वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी Lyrics

वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी

वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी.
वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी…. ||२||

वेडी झाली राधा ऐकून बासरी
ही वेडी झाली राधा ऐकून बासरी.. ||२||

घाटा मधली मी नार गौळया च्या घर ची
धळ ची एक ही उरा  नित्य सासर ची
तरी माया कमीच ना होई तुझा वरची 
जादू काय ही म्हणावी त्या मनोहर ची.

भेटी साठी नाचे मनात मयूरी
भेटी साठी नाचे मनात मयूरी….. 

वेडी झाली राधा ऐकून बासरी
ही वेडी झाली राधा ऐकून बासरी.. ||२||

झोप नयनाची गेली हरपुनी गेले भान
तन मन भान सारे घेतले मुकुंदान
या वरती उपाय सांगी नाकुण
जीव खाली वरती होतो या अश्या भ्या न

त्याची ओढ लागे माझ्या या अंतरी
त्याची ओढ लागे माझ्या या अंतरी

वेडी झाली राधा ऐकून बासरी
ही वेडी झाली राधा ऐकून बासरी.. ||२||

टपुर चांदण्याचि माझ्या निरात
पलंगवरती पोहूणी होती मि निदरेत
असा चोरून जपुनी हळु आला आत
जपकण श्रीधराणे धरला ग माझा हात

दचकले स्वपनात मि झाले बावरी
दचकले स्वपनात मि झाले बावरी

वेडी झाली राधा ऐकून बासरी
ही वेडी झाली राधा ऐकून बासरी.. ||२||

विसरता विसरेना त्याचि सावळी मूर्ती
आठवण सारखी छळते मला एकांती
मन मंदिरी बसला ज्याची दिगंत कीर्ती
त्याच्या छायेण उत्तमग नाचली धरती
छेडति मजला सारी गोकुळ नगरी
छेडति मजला सारी गोकुळ नगरी

वेडी झाली राधा ऐकून बासरी
ही वेडी झाली राधा ऐकून बासरी.. ||२||

वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी.
वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी…. ||२||

वेडी झाली राधा ऐकून बासरी
ही वेडी झाली राधा ऐकून बासरी.. ||२||

4. कान्हा ग बाई हळूच मरतो खडा Lyrics

कान्हा ग बाई हळूच मरतो खडा

काय करावा किती जपावा फुटल माझा घडा
काय करावा किती जपावा फुटल माझा घडा

कान्हा ग बाई हळूच मरतो खडा कृष्णा ग बाई हळूच मरतो खडा

काय करावा किती जपावा फुटल माझा घडा
काय करावा किती जपावा फुटल माझा घडा

कान्हा ग बाई हळूच मरतो खडा कृष्णा ग बाई हळूच मरतो खडा

दहया दुधाच बाई माठ शिरावर
आडवी तो आम्हा यमुने तीरावर
दहया दुधाच बाई माठ शिरावर आडवी तो आम्हा यमुने तीरावर
खोड काढतो वेण्या ओढतो
उरात होई धड धडा
कान्हा ग बाई हळूच मरतो खडा कृष्णा ग बाई हळूच मरतो खडा

कितीनदा सांगितले नंद मामंजिला विणवले किती आई यशोदेला
कितीनदा सांगितले नंद मामंजिला विणवले किती आई यशोदेला
पदर पाडिटो हात मोडिटो खिचतो तो हा चुडा
पदर पाडिटो हात मोडिटो खिचतो तो हा चुडा
कान्हा ग बाई हळूच मरतो खडा कृष्णा ग बाई हळूच मरतो खडा

एका जनार्दणी किती सांगावे पूर्ण कृपेचे ग दान मागावे
एका जनार्दणी किती सांगावे पूर्ण कृपेचे ग दान मागावे
लोण्यासाठी लाभेपाठी पेंद्या बोलतो गडा

कान्हा ग बाई हळूच मरतो खडा कृष्णा ग बाई हळूच मरतो खडा

5. रूतला पाई काटा Lyrics

रूतला पाई काटा कान्हा ने काढला

यमुनेच्या काठी घडा फोडीला यमुनेच्या काठी घडा फोडीला
रूतला पाई काटा कान्हा ने काढला
रूतला पाई काटा कान्हा ने काढला

आश्या मज त्या श्री कृष्णा चि होणार सून मि त्या यशोदची
आश्या मज त्या श्री कृष्णा चि होणार सून मि त्या यशोदची

हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला

रूतला पाई काटा कान्हा ने काढला
रूतला पाई काटा कान्हा ने काढला

पिचकारी मंदी भरूणी रंग नको रे कान्हा भिजल माझ आंग
पिचकारी मंदी भरूणी रंग नको रे कान्हा भिजल माझ आंग

हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला

रूतला पाई काटा कान्हा ने काढला
रूतला पाई काटा कान्हा ने काढला

निजलेली होती मिज मंदरी अवचित आला तुझा मुरारी
निजलेली होती मिज मंदरी अवचित आला तुझा मुरारी

हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला

रूतला पाई काटा कान्हा ने काढला
रूतला पाई काटा कान्हा ने काढला

जनी मनी अश्या रिती समजविते कान्हा पोटी
जनी मनी अश्या रिती समजविते कान्हा पोटी

हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला

रूतला पाई काटा कान्हा ने काढला
रूतला पाई काटा कान्हा ने काढला

यमुनेच्या काठी घडा फोडीला यमुनेच्या काठी घडा फोडीला
रूतला पाई काटा कान्हा ने काढला
रूतला पाई काटा कान्हा ने काढला

6. सख्यानो चला Lyrics

सख्यानो चला मथुरेच्या बाजारी

सख्यानो चला मथुरेच्या बाजारी सख्यानो चला मथुरेच्या बाजारी
सख्यानो चला मथुरेच्या बाजारी सख्यानो चला मथुरेच्या बाजारी

इथ तिथ थांबू नका कोणाशी ही बोलू नका
इथ तिथ थांबू नका कोणाशी ही बोलू नका
रस्ता धरा लवकरी आता रस्ता धरा लवकरी
सख्यानो चला मथुरेच्या बाजारी सख्यानो चला मथुरेच्या बाजारी

लय खट्याळ गोकुलचा तो काळ नेमकीच साधतोय बाजाराची वेळ
आता रस्ता धरा लवकरी आता रस्ता धरा लवकरी
सख्यानो चला मथुरेच्या बाजारी सख्यानो चला मथुरेच्या बाजारी

जरी आला आडवा गोकुळचा हा राणा सांगायचा त्याला घरचा रस्ता धरणा धरणा
माठ उचला ग लवकरी माठ उचला ग लवकरी
सख्यानो चला मथुरेच्या बाजारी सख्यानो चला मथुरेच्या बाजारी

अश्या त्या कृष्ण लीला अश्या त्या कृष्ण लीला
आनंद होतो संत जणीला आनंद होतो संत जणीला
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
असा गजर होतो पांढर पुरी असा गजर होतो पांढर पुरी
सख्यानो चला मथुरेच्या बाजारी सख्यानो चला मथुरेच्या बाजारी

इथ तिथ थांबू नका कोणाशी ही बोलू नका
इथ तिथ थांबू नका कोणाशी ही बोलू नका
रस्ता धरा लवकरी आता रस्ता धरा लवकरी
सख्यानो चला मथुरेच्या बाजारी सख्यानो चला मथुरेच्या बाजारी

7. राधे चल माझ्या गावाला जाऊ Lyrics

राधे चल माझ्या गावाला जाऊ

राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू
राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू

गोकुळ माझ गाव आहे गावात माझ नाव
गोकुळ माझ गाव आहे गावात माझ नाव
राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू

वासुदेव माझा पिता आहे देवकी माझी माता
वासुदेव माझा पिता आहे देवकी माझी माता
राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू

एकाजनार्दणी राधा लागली कृष्णाच्या नादा
एकाजनार्दणी राधा लागली कृष्णाच्या नादा
राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू

8. दही दूध खाऊनी Lyrics

दही दूध खाऊनी माठ फोडिटो

सांज सकाळी भलत्या वेळी घरामध्ये घुसतो
कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो
दही दूध खाऊनी माठ फोडिटो मस्करी माझी करितो
कान्हा ग बाई दही दूध खाऊनी माठ फोडिटो मस्करी माझी करितो

उंच माळ्यावर बांधले शिंके उंच माळ्यावर बांधले शिंके
हात कसा पुरतो कान्हाचा बाई हात कसा पुरतो
मंजर म्हणूनी त्यास मारीता मजवर गुरकवतो
मंजर म्हणूनी त्यास मारीता मजवर गुरकवतो

जात मि होते यमुनेच्या पाण्या जात मि होते यमुनेच्या पाण्या
वाट माझी धारितो कान्हा ग बाई वाट माझी धारितो
माझा चेंडू हरपला राधे तुज जवली दिसतो
माझा चेंडू हरपला राधे तुज जवली दिसतो

जिकडे पहावे तिकडे हरी जिकडे पहावे तिकडे हरी
एकटी दिसतो हरी ग बाई एकटी दिसतो
म्हणे मुकताबाई नवे गडे कृष्ण हा पांडुरंग दिसतो
म्हणे मुकताबाई नवे गडे कृष्ण हा पांडुरंग दिसतो

सांज सकाळी भलत्या वेळी घरामध्ये घुसतो
कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो
दही दूध खाऊनी माठ फोडिटो मस्करी माझी करितो
कान्हा ग बाई दही दूध खाऊनी माठ फोडिटो मस्करी माझी करितो

9. नको रे वाजऊ बासरी Lyrics

नको रे वाजऊ बासरी

नको रे वाजऊ बासरी नको रे वाजऊ बासरी

स्वर मुरलीचा ऐकुनी कानी यशोदे साजणी
आरे नंदलाला विनंती तूजला
आरे नंदलाला विनंती जाऊदे बाजारी
नको रे वाजऊ बासरी नको रे वाजऊ बासरी

अनियची मि गावळण राधा दहया दुधाचा आमचा धंदा
आरे नंदलाला विनंती तूजला
आरे नंदलाला विनंती जाऊदे बाजारी
नको रे वाजऊ बासरी नको रे वाजऊ बासरी

डोईवर माझ्या बरेच माठ हळु हळु चढते मि यमुनेचा घाट
डोईवर माझ्या बरेच माठ हळु हळु चढते मि यमुनेचा घाट
आरे नंदलाला विनंती तूजला
आरे नंदलाला विनंती जाऊदे बाजारी
नको रे वाजऊ बासरी नको रे वाजऊ बासरी

एकाजनार्दणी विणविति राधा शरण मि आले तुला गोविंदा
एकाजनार्दणी विणविति राधा शरण मि आले तुला गोविंदा
आरे नंदलाला विनंती तूजला
आरे नंदलाला विनंती जाऊदे बाजारी
नको रे वाजऊ बासरी नको रे वाजऊ बासरी

स्वर मुरलीचा ऐकुनी कानी यशोदे साजणी
आरे नंदलाला विनंती तूजला
आरे नंदलाला विनंती जाऊदे बाजारी
नको रे वाजऊ बासरी नको रे वाजऊ बासरी

10. माझा माठ फोडीला Lyrics

माझा माठ फोडीला

चुकले बाई करु मि काय ग याच्या वाईट खोडीला आग चुकले बाई करु मि काय ग याच्या वाईट खोडीला
ग माझा माठ फोडीला ग याने माझा माठ फोडीला

थकले बाई करु मि काय ग याच्या वाईट खोडीला ग याने माझा माठ फोडीला

गवळी याच्या घरी जातो दही दूध चोरूणी खातो
गवळी याच्या घरी जातो दही दूध चोरूणी खातो
पेंदया सुद्धा मा घेउनी येतो जोडीला पेंदया सुद्धा मा घेउनी येतो जोडीला
ग माझा माठ फोडीला ग याने माझा माठ फोडीला

असा कसा कृष्ण नाथ याला कळेना दिवस रात
असा कसा कृष्ण नाथ याला कळेना दिवस रात
घालून गळ्यात हात याने हार तोडीला
घालून गळ्यात हात याने हार तोडीला
ग माझा माठ फोडीला ग याने माझा माठ फोडीला

असा कसा धन नीळ घाली पदराला पीळ
असा कसा धन नीळ घाली पदराला पीळ
हे माझ्या कुंकुवाच टिळा याने हसत मोडीला कुंकुवाच टिळा याने हसत मोडीला
ग माझा माठ फोडीला ग याने माझा माठ फोडीला

एकाजनार्दणी हरी आम्ही गावळीच्या नारी एकाजनार्दणी हरी आम्ही गावळीच्या नारी
शरण आलो देवा तुला हात जोडीला शरण आलो देवा तुला हात जोडीला
ग माझा माठ फोडीला ग याने माझा माठ फोडीला

थकले बाई करु मि काय ग याच्या वाईट खोडीला ग याने माझा माठ फोडीला

11. गोपी गलबला झाला Lyrics

गोपी गलबला झाला कृष्ण जन्मला

गोपी गलबला गोपी गलबला
गोकुळ नगरी ला या या गोकुळ नगरीला
कृष्ण जनमला ग सखी या अष्टमीला कृष्ण जनमला ग सखी भाद्र अष्टमीला

घागर घेउनी पाण्याची जाता घागर घेउनी पाण्याची जाता
माठ डोईवर पाझरला
कृष्ण जनमला ग सखी या अष्टमीला कृष्ण जनमला ग सखी भाद्र अष्टमीला

गोपी गलबला गोपी गलबला
गोकुळ नगरी ला या या गोकुळ नगरीला
कृष्ण जनमला ग सखी या अष्टमीला कृष्ण जनमला ग सखी भाद्र अष्टमीला

राधा संगे यशोदेला सांग यशोदे तुझ्या कान्हाला
राधा संगे यशोदेला सांग यशोदे तुझ्या कान्हाला
किती छळीतो मजला किती छळीतो मजला
कृष्ण जनमला ग सखी या अष्टमीला कृष्ण जनमला ग सखी भाद्र अष्टमीला

गोपी गलबला गोपी गलबला
गोकुळ नगरी ला या या गोकुळ नगरीला
कृष्ण जनमला ग सखी या अष्टमीला कृष्ण जनमला ग सखी भाद्र अष्टमीला

एका जनार्दणी साऱ्या गवळणी एका जनार्दणी साऱ्या गवळणी
विसरू नका हो त्याला विसरू नका हो त्याला
कृष्ण जनमला ग सखी या अष्टमीला कृष्ण जनमला ग सखी भाद्र अष्टमीला

गोपी गलबला गोपी गलबला
गोकुळ नगरी ला या या गोकुळ नगरीला
कृष्ण जनमला ग सखी या अष्टमीला कृष्ण जनमला ग सखी भाद्र अष्टमीला

12. बाई माझ्या दुधात नाही पानी Lyrics

बाई माझ्या ग दुधात नाही पानी

बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग
बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पानी
बाई माझ्या ग दुधात नाही पानी

गोकुळ च्या त्या गाई म्हशीत गोकुळ च्या त्या गाई म्हशीत
खान सगळ रान माळात खान सगळ रान माळात
उगीच कशाला चाखून बघायच उगीच कशाला चाखून बघायच
पैश्या विना हीन पैशया विना हीन
बाई माझ्या ग दुधात नाही पानी, बाई माझ्या ग दुधात नाही पानी

यमुनेचा तो अवघड घाट यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुखते पाठ चढता चढता दुखते पाठ
नेहमीच याची बाई कट कट नेहमीच याची बाई कट कट
थांबू नका गवळणी ग बाई ग थांबू नका गवळणी
बाई माझ्या ग दुधात नाही पानी, बाई माझ्या ग दुधात नाही पानी

महानंदाचि वेडी माया महानंदाचि वेडी माया
देवासाठी तिची चुकली काया देवासाठी तिची चुकली काया
एकाजनार्दणी पडू त्याच्या पाया एकाजनार्दणी पडू त्याच्या पाया
देवलीन होईनी ग बाई ग देवलीन होईनी
बाई माझ्या ग दुधात नाही पानी, बाई माझ्या ग दुधात नाही पानी

बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग
बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पानी
बाई माझ्या ग दुधात नाही पानी

13. छुम छन न न न न Lyrics

छुम छन न न न न न

छुम छन न न न न न छुम छन न न न न न
छुम छनक छन छन
कृष्णाच्या बाळा च्या पाई वाजती पैजन कृष्णाच्या बाळा च्या पाई वाजती पैजन

बाळा च्या माथ्याला शोभे पिंपळ पान
बाळा च्या माथ्याला शोभे पिंपळ पान
बाळाचे रूप ते अति साजिरे गोजिरे
बाळाचे रूप ते अति साजिरे गोजिरे
छुम छन न न न न न छुम छन न न न न न
छुम छनक छन छन
कृष्णाच्या बाळा च्या पाई वाजती पैजन कृष्णाच्या बाळा च्या पाई वाजती पैजन

बाळाच्या कंबरेल पिवळा शोभे पीतांबर
बाळाच्या कंबरेल पिवळा शोभे पीतांबर
बाळाचे रूपते अति सुंदर मनोहर
बाळाचे रूपते अति सुंदर मनोहर
छुम छन न न न न न छुम छन न न न न न
छुम छनक छन छन
कृष्णाच्या बाळा च्या पाई वाजती पैजन कृष्णाच्या बाळा च्या पाई वाजती पैजन

एकाजनार्दणी सावळा रंग त्याच्या कोवळा
एकाजनार्दणी सावळा रंग त्याच्या कोवळा
रंग त्याचा कोवळा यांनी भुलविल्या गोकीवाळा
रंग त्याचा कोवळा यांनी भुलविल्या गोकीवाळा
छुम छन न न न न न छुम छन न न न न न
छुम छनक छन छन
कृष्णाच्या बाळा च्या पाई वाजती पैजन कृष्णाच्या बाळा च्या पाई वाजती पैजन

14. पाण्या निघाली गवळण Lyrics

पाण्या निघाली गवळण

पाण्या निघाली गवळण पाण्या निघाली गवळण
रुण झुण बाई वाजती पैजन रुण झुण बाई वाजती पैजन

झुळ झुळ बाई वारा वाही डोईवर ना पदर राही
झुळ झुळ बाई वारा वाही डोईवर ना पदर राही
पाण्या निघाली गवळण पाण्या निघाली गवळण
रुण झुण बाई वाजती पैजन रुण झुण बाई वाजती पैजन

पानी असता पाण्याशी गेले मुरली वाजता भुलून गेले
पानी असता पाण्याशी गेले मुरली वाजता भुलून गेले
पाण्या निघाली गवळण पाण्या निघाली गवळण
रुण झुण बाई वाजती पैजन रुण झुण बाई वाजती पैजन

एकाजनार्दणी गवळण राधा कृष्ण संख्याची जळली बाधा
एकाजनार्दणी गवळण राधा कृष्ण संख्याची जळली बाधा
पाण्या निघाली गवळण पाण्या निघाली गवळण
रुण झुण बाई वाजती पैजन रुण झुण बाई वाजती पैजन

15. लहान लहान मुले Lyrics

लहान लहान लहान मुले घेऊन

लहान लहान लहान मुले घेऊन
लहान लहान लहान मुले घेऊन
खोड्या करीखोड्या करीखोड्या करी
खोड्या करी मन मोहन

घरा आमुच्या घरी येऊन चोरी करी दही दूध लोणी
घरा आमुच्या घरी येऊन चोरी करी दही दूध लोणी
चोरी जाई दूध लोणी घरा आमच्या येऊन
खोड्या करी मन मोहन मन मोहन मोहन मोहन
खोड्या करी मन मोहन मन मोहन मोहन मोहन

शंक चक्र मिलन करी चक्र मिलन करी
शंक चक्र मिलन करी चक्र मिलन करी
कायवणी शी जाव्या हरी बांधीशी मन मोहना
खोड्या करी मन मोहन मन मोहन मोहन मोहन
खोड्या करी मन मोहन मन मोहन मोहन मोहन

लागवी हा चक्र पानी जनी हासे हासे गाय गाणी
जनी हासे गाय गाणी हासे गाय गाणी गाऊन
खोड्या करी मन मोहन मन मोहन मोहन मोहन
खोड्या करी मन मोहन मन मोहन मोहन मोहन

लहान लहान लहान मुले घेऊन
लहान लहान लहान मुले घेऊन
खोड्या करीखोड्या करीखोड्या करी
खोड्या करी मन मोहन

खोड्या करी मन मोहन मन मोहन मोहन मोहन
खोड्या करी मन मोहन मन मोहन मोहन मोहन

16. आला बघा मुरलीवाला Lyrics

आला बघा मुरलीवाला

हांडी फोडाया लोणी काढाया हांडी फोडाया लोणी काढाया
काराया गोपाल काला काराया गोपाल काला
आला बघा आला बघा मुरलीवाला

ज्याच्या संगती लाग सुदाम पिंडया भारी
कानखुसल घरात करून या बलजोरी
सांगू चला यशोदेला सांगू चला यशोदेला
आला बघा आला बघा मुरलीवाला

झाल्या हुशार ह्या गोकुळ च्या गवळणी
म्हणे दही दूध हे लपून ठेवा कुणी
हा कान्हा लय मुजोर झाला हा कृष्णा लय मुजोर झाला
आला बघा आला बघा मुरलीवाला

सर गोकुळ हे झाल या हैराण
करा कही तरी जो तो म्हणे प्रेमान
लय खट्याळ हा नंदलाला लय खट्याळ हा नंदलाला
आला बघा आला बघा मुरलीवाला

हांडी फोडाया लोणी काढाया हांडी फोडाया लोणी काढाया
काराया गोपाल काला काराया गोपाल काला
आला बघा आला बघा मुरलीवाला

17. आज बाळ कृष्ण जन्मला Lyrics

आज बाळ कृष्ण जन्मला

श्रावणात या अष्टमिला आनंद हा झाला
आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ कृष्ण जन्मला नंदाघरी
आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी
चला ग पाहूया त्याला आज बाळ कृष्ण जन्मला नंदाघरी
बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी

रूप त्याचे सावळे कृष्ण मूर्ती दिव्य किरणानी सजली ही धरती
उजाळिल्या ग कोणी दीप ज्योति जणू स्वर्ग अवतरला भूवरती
आला आला तो नंदलाला
हिणविल्या ना छळणाऱ्या दुष्टाचा काळ हा आला
बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी

गेली हरपून यशोदा माई केशवाची गाते ही अंगाई
रेशमाच्या दोरीने झोका देई चंदणाच्या पळणी झोपी जाई
तो गिरिधारी कृष्ण मुरारी
चला सयानो जाऊ पाहू घेऊ दर्शनाला
बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी

सनई चौघडा तालात वाजतो सारा गोकुळी सोहळा हा गाजतो
लाडीवळ्या वनमाई ला पाहतो त्यान भातुक चंद्र ही लाजतो
मधुसुधनाला त्या गोविंदला
पंच आरती करून उत्तम ओवाळू गोपाळा
बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी

श्रावणात या अष्टमिला आनंद हा झाला
आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ कृष्ण जन्मला नंदाघरी
चला ग पाहूया त्याला आज बाळ कृष्ण जन्मला नंदाघरी
बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी

18. ऐक ऐक सखे बाई Lyrics

ऐक ऐक सखे बाई

ऐक ऐक सखे बाई नवल मी सांगू काही
ऐक ऐक सखे बाई नवल मी सांगू काही
त्रयलोक्याचा धनी तो यशोदेस म्हणे आई
आई आई आई आई आई

देवकिने वहिला यशोदेणे पळीला देवकिने वहिला यशोदेणे पळीला
पांडवांचा बंधु जन होउनिया राहिला पांडवांचा बंधु जन होउनिया राहिला
आई आई आई आई आई
त्रयलोक्याचा धनी तो यशोदेस म्हणे आई
आई आई आई आई आई

19. धाकामधला माझा मोहन माझा Lyrics

धाकामधला माझा मोहन माझा

धाकामधला माझा मोहन माझा धाकामधला माझा मोहन माझा
तुम्हास छळेल कसा ग बाई बाई
नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ आळ असा
नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ आळ असा

कुणी म्हणावे घागर आमची फोडली कधी कोणाची वेणी धरून ओढली
कोणी सांगती खोड ग आमची काढली कृष्णाने ग लाज आता ग सोडली
कोणी म्हणावे तुझा यशोदे कोणी म्हणावे तुझा यशोदे कान्हा येडा पिसा
नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ आळ असा
नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ आळ असा

तुझी गोपिका न्हाताना यमुनेवारी तो ग कश्याला पहिल ते कळंबवरी
साड्या पळविल का तुमच्या सांगा तरी अजून बाई तान्हा माझ्या श्री हरी
बाळकृष्ण अज्ञान नाही का बाळकृष्ण अज्ञान नाही का आपल्याशीच असा
नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ आळ असा
नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ आळ असा

ऐकून त्या का गाळया जीव ग पंगला काल हरीला उखळाशी मी बांधला
तेव्हा कश्या मग सर्वजणी ग धावल्या लगबगली करण्या कश्या सरसावल्या
घडीत रुसवा फुगवा तुमचा घडीत रुसवा फुगवा तुमचा न्याय गडे खासा ग बाई बाई
नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ आळ असा
नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ आळ असा

श्याम गुणांचा माझ्या ग श्री नंद हा वेणु छेडिता गोकुळात आनंदाला
तो आपल्या छंदात सदाचा दंगला तुम्हा कशाला भुलविल गा श्री नंदला
मनमोहन तो संजय माझा मनमोहन तो संजय माझा नाही मुळीच तसा ग बाई बाई
नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ आळ असा
नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ आळ असा

धाकामधला माझा मोहन माझा धाकामधला माझा मोहन माझा
तुम्हास छळेल कसा ग बाई बाई
नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ आळ असा
नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ आळ असा

20. यशोदा तुझ्या कृष्णाने Lyrics

यशोदा तुझ्या कृष्णाने लाज सोडली

यशोदा तुझ्या कृष्णाने लाज सोडली यशोदा तुझ्या कृष्णाने लाज सोडली
त्या राधे ची ग टचकन बंगड़ी फोडली त्या राधे ची ग टचकन बंगड़ी फोडली

हा दिसयला दिसतो कसा भोळा भाबडा पण तुला नाही ठाव किती आहे रांगडा
ये समजल का
हा दिसयला दिसतो कसा भोळा भाबडा पण तुला नाही ठाव किती आहे रांगडा
ह्या चित्त चोराने तिच्याशी प्रीत जोडली ह्या चित्त चोराने तिच्याशी प्रीत जोडली
त्या राधे ची ग टचकन बंगड़ी फोडली त्या राधे ची ग टचकन बंगड़ी फोडली

ह्या पोरी जाता मथुरेच्या बाजारी आड वाटेवरी शिरजोरी करतो श्रीहरी
ह्या पोरी जाता मथुरेच्या बाजारी आड वाटेवरी शिरजोरी करतो श्रीहरी
हळू पाठीमागुणी कसकन वेणी ओढली हळू पाठीमागुणी कसकन वेणी ओढली
त्या राधे ची ग टचकन बंगड़ी फोडली त्या राधे ची ग टचकन बंगड़ी फोडली

तो पेंदया बोंबड्या सुदामा घेउनी संगती उत्तम ही मजा लुटतो अश्या करतो या जमती
तो पेंदया बोंबड्या सुदामा घेउनी संगती उत्तम ही मजा लुटतो अश्या करतो या जमती
या गोपीकणा छेडण्याची सवय वाढली या गोपीकणा छेडण्याची सवय वाढली
त्या राधे ची ग टचकन बंगड़ी फोडली त्या राधे ची ग टचकन बंगड़ी फोडली

यशोदा तुझ्या कृष्णाने लाज सोडली यशोदा तुझ्या कृष्णाने लाज सोडली
त्या राधे ची ग टचकन बंगड़ी फोडली त्या राधे ची ग टचकन बंगड़ी फोडली

21. मुरलीवाला मुरलीवाला Lyrics

मुरलीवाला मुरलीवाला

मुरलीवाला मुरलीवाला मुरली मुरली मुरलीवाला
मुरलीवाला मुरलीवाला मुरली मुरली मुरलीवाला
मनमोहन मुरलीवाला
मुरलीवाला नंदाचा अलबेला मुरलीवाला नंदाचा अलबेला

22. नको वाजवू श्रीहरी मुरली Lyrics

नको वाजवू श्रीहरी मुरली

नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे

नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली

घरी करीत होते मी काम धंदा
घरी करीत होते मी काम धंदा
घरी करीत होते मी काम धंदा
घरी करीत होते मी काम धंदा

तेथे मी गडबडली रे
तेथे मी गडबडली रे

नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली

घागर घेऊनी पाणियासी जाता
घागर घेऊनी पाणियासी जाता
घागर घेऊनी पाणियासी जाता
घागर घेऊनी पाणियासी जाता

डोईवर घागर पाझरली
डोईवर घागर पाझरली

नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली

एका जनार्दनी पूर्ण कृपेने
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
एका जनार्दनी पूर्ण कृपेने

राधा गवळण घाबरली
राधा गवळण घाबरली

नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली

तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे

नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली

Play All the top 20 Gavalni on YouTube here:

Table of Contents

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *